श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट
श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महा राज्य (रजी: महा/956/2018/पुणे) 12A/80G & CSR छत्रपती शिवाजी महाराजनचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व कोल्हापूरच्या गादीचे वंशज श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या संस्थेच्या मार्फत संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली मागील 5 वर्षांपासून ट्रस्ट सामाजिक कार्यात काम करत आहे, त्याचबरोबर रक्तदानाचे कार्य हाती घेतले आहे,
आज तागायत ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्भर 600+ च्या वरती रक्तदान शिबिर घेऊन, गोरगरीब रुग्णांना जवळपास 1000+ च्या वरती लोकांना मोफत रक्ताची बॅग उपलब्ध करून देण्यात ट्रस्ट ला यश आले आहे.
पूर्ण महाराष्ट्र भर ट्रस्ट वरती विश्वास ठेवून 55,000 - 60,000 रक्तदात्यांनि रक्तदान केले आहे त्याचबरोबर लॉक डाऊन च्या काळात जवळपास 92 रक्तदान शिबिर घेऊन रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी ही ट्रस्ट चा मोलाचा वाटा आहे अनेक सामाजिक कार्यातही ट्रस्ट पुढे असते यापुढेही असेच कार्य अविरत करत राहू असे शिवश्री भूषन सुर्वे यांच्याकडून सांगण्यात आले.